एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते. तुमच्या वैयक्तिक भेटीची नोंद असावी, या उद्देशाने आम्ही ही माहिती बाळगत नाही. आमच्या संकेतस्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हाला या माहितीचा उपयोग होतो. संकेतस्थळ वापरणाऱ्या व्यक्तीने या संकेतस्थळावर कोणती माहिती / तपशील पाहिले, यावर आम्ही लक्ष ठेवत नाही. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षच्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहितीची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे आणि कशासाठी वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल; तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.