धर्मादाय रुग्ण योजना म्हणजे नेमकी कोणती योजना आहे आणि योजना कोणत्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत ?
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम कलम ४१ अअ च्या तरतुदींनुसार मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या रिट याचिका (पीआयएल) क्र.३१३२/२००४ मधील दिनांक १७.०८.२००६ व दिनांक १५.०४.२००९ च्या आदेशाप्रमाणे सदर मंजूर योजना आहे.
सदर धर्मादाय रुग्ण योजना निर्धन (ज्या रुग्णाचे तहसीलदार प्रमाणित एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.१,८०,०००/-रुपयांपेक्षा अधिक नसेल) व दुर्बल (ज्या रुग्णाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.३,६०,०००/- रुपयांपेक्षा अधिक नसेल) या घटकांतील रुग्णांकरिता उपलब्ध आहे.
टीप : निर्धन व दुर्बल घटकांकरीता पात्र रुग्णांची उत्पन्न मर्यादा ही शासनाने वेळोवेळी निर्धारीत केल्याप्रमाणे असेल.
सदर धर्मादाय रुग्ण योजना निर्धन (ज्या रुग्णाचे तहसीलदार प्रमाणित एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.१,८०,०००/-रुपयांपेक्षा अधिक नसेल) व दुर्बल (ज्या रुग्णाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.३,६०,०००/- रुपयांपेक्षा अधिक नसेल) या घटकांतील रुग्णांकरिता उपलब्ध आहे.
टीप : निर्धन व दुर्बल घटकांकरीता पात्र रुग्णांची उत्पन्न मर्यादा ही शासनाने वेळोवेळी निर्धारीत केल्याप्रमाणे असेल.
सदर योजना कोणत्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे ?
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० (मुं.सा.वि. अधिनियम १९५०) मधील तरतुदींखाली नोंद झालेले सार्वजनिक धर्मादाय न्यास जे धर्मादाय रुग्णालय ज्यामध्ये शुश्रुषालय / प्रसूतीगृह / रुग्णालय किंवा वैद्यकीय मदत देणारे इतर केंद्र यांचा समावेश आहे, चालवित आहेत आणि ज्यांचा वार्षिक खर्च हा रु.५ लाखांपेक्षा जास्त आहे ते कलम ४१ अअ च्या खंड (४) च्या अंतर्गत “शासकीय अनुदानित सार्वजनिक न्यास” आहेत. सदर रुग्णालयांची यादी संकेतस्थळावरील “योजनेखालील रुग्णालये” या निर्देशिकेखाली उपलब्ध आहे.
सदर योजनेचा फायदा घेण्याकरिता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ?
- तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
----- किंवा ----- - शिधापत्रिका / दारिद्र्य रेषेखालील पत्रिका
सदर योजनांतर्गत कोणत्या आजारांचा समावेश होतो ?
नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांमध्ये ज्या ज्या आजारांवर उपचार होतो, त्या- त्या सर्व आजारांचा या योजनेत समावेश होतो.
सदरहू योजनांतर्गत उपचाराच्या रकमेची मर्यादा काय आहे ?
सदर योजनेमध्ये उपचारासाठी रकमेची मर्यादा निश्चित नाही. तथापि, निर्धन रुग्णांकरिता उपचार मोफत आहेत आणि दुर्बल घटकांतील रुग्णांकरिता विहीत सवलतीच्या दराने उपचार करण्यात येतात.
सदर योजनांतर्गत रुग्णालयात दाखल करताना अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे का?
निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करताना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, दुर्बल घटकांतील रुग्णांना उपचारानंतर निर्धारित केलेली रक्कम भरावी लागते.
उपचारादरम्यान आवश्यक औषधे / वस्तू रुग्णालयात उपलब्ध नसल्यास बाहेरुन विकत आणाव्या लागतील का ?
नाही
धर्मादाय रुग्ण योजनांतर्गत मिळत असलेले उपचार व पैसे भरणाऱ्या रुग्णाचे उपचार अथवा उपचाराचा दर्जा यामध्ये काही फरक आहे का ?
उपचारांमध्ये अथवा उपचाराच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक असणार नाही
सदर योजनांतर्गत एकदा उपचार घेतल्यास त्याच रुग्णास दुसऱ्या आजारासाठी योजनांतर्गत उपचार घेता येईल काय ?
होय
धर्मादाय रुग्णालया व्यतिरिक्त अन्य रुग्णालयात उपचार सुरु असल्यास पात्र रुग्णाला उर्वरित उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयामध्ये हस्तांतरीत करुन योजने अंतर्गत उपचार मिळू शकणार का ?
होय