आमच्याविषयी
निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरिता
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष
मा. उप मुख्यमंत्री (गृह, विधि व न्याय) यांचे कार्यालय
प्रस्तावना
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता योजना तयार केली आहे. त्यानुसार, “प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १०% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.”
सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गृह, विधि व न्याय विभागाच्या दि.३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.
- राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष हा ५ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहे.
उद्देश
- राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांतील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देणे.
- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम,१९५० च्या कलम ४१ अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.३१३२ / २००४ मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तयार केलेल्या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करणे.
- धर्मादाय रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची वस्तुस्थिती, निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सेवांसाठी योग्य प्रवेश प्रदान करणे.
- धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी त्यावर केंद्रीकृत पध्दतीने देखरेख ठेवणे व योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करणे.
- धर्मादाय रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला योग्य रुग्णसेवा व उपचार मिळत असल्याची खात्री करणे.
अधिक माहितीसाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाला येथे संपर्क करा.
हेल्पलाईन क्रमांक: १८०० १२३ २२११
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२२०२००४५ / ०२२-२२०२००४६
ईमेल: charityhelp[dot]dcmo[at]maharashtra[dot]gov[dot]in